संत तुकाराम अभंग - संग्रह १

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग.


नेणें करुं जप साधन नेमाचे...

नेणें करुं जप साधन नेमाचें । नावडे फुकाचें नाम वांचे ॥१॥

नाहीं केली भक्ति न घडली सेवा । अनिवार जीवा वासना हे ॥२॥

म्हणउनी आलों भेणें पायांपाशीं । तुम्हा कळे तैसी राखा बुद्धि ॥३॥

जाचलोंसे भारी कामक्रोध वैरी । नागविलों चोरीं कोणा सांगों ॥४॥

तुका ह्मणे नाम धरीं जपमाळा । येवोनी गोपाळा क्षेम देईं ॥५॥