सर्वकाळ आम्हा आवडी न पुरे । सेवितां न सरे सवें गांठी ॥१॥
न पुरे हा जन्म तें सुख सांठितां । पुढतीहि आतां हेंचि मागों ॥२॥
मारगाची चिंता पालखी बैसतां । नाहीं उसंतिता कोस पेणें ॥३॥
तुका म्हणे माझी विठ्ठल माउली । जाणे ते लागली भूकतान ॥४॥