माझ्या बोबडिया बोला । चित्त द्यावें गा विठ्ठला ॥१॥
तुझ्या नामाची न लाज । जनासवें काय काज ॥२॥
मज हांसतील लोक । परि मी गाईन निःशंक ॥३॥
तुका ह्मणे कमळापति । माझी परिसावी विनंति ॥४॥