संत तुकाराम अभंग - संग्रह १

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग.


तुझे पायीं सर्व मानिला वि...

तुझे पायीं सर्व मानिला विश्वास । न करीं उदास आतां मज ॥१॥

जीवीं गातां गोड आईकतां कानीं । पाहतां लोचनीं मूर्ति तुझी ॥२॥

मन स्थिर झालें माझें पैं निश्चळ । वारिले सकळ आशापाश ॥३॥

जन्म जरा व्याधी निवारिसी दुःख । वोसंडलें सुख प्रेमधार ॥४॥

तुका म्हणे मज झाला हा निर्धार । आतां वायां फार काय बोलों ॥५॥