संत तुकाराम अभंग - संग्रह १

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग.


विठोबा विसांविया । पडों द...

विठोबा विसांविया । पडों देईं आपुल्या पायां ॥१॥

बहु खेदक्षीण । झालों सोसुनियां वन ॥२॥

बहुता काकुलती । आलों सोसिली फजिती ॥३॥

केली तुजसाठीं । तुका म्हणे एवढी आटी ॥४॥