नाहीं हरिच्या दासां भोग । तरि कां आम्हा पीडी रोग ॥१॥
तरि हें दिसे लाजिरवाणें । काय तुम्हासी सांगणें ॥२॥
आम्हा काळ खाय । बोलिलें तें वांयां जाय ॥३॥
तुका म्हणें दास । आम्ही भोगूं गर्भवास ॥४॥