संत तुकाराम अभंग - संग्रह १

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग.


जैसे तुम्ही दूरी आहां । त...

जैसे तुम्ही दूरी आहां । तैसे रहा अंतरें ॥१॥

नका येऊं देऊं आळ । अंगीं गोपाळ जडलासे ॥२॥

अवघाचि राखा काळ । विक्राळचि भोंवता ॥३॥

तुका म्हणे मज ऐसा । होतां पिसा जग निंद्य ॥४॥