तुजवांचुनियां दुजा नाहीं चित्तीं । येणें काकुळती याजसाठीं ॥१॥
भेटोनियां बोला आवडीचें गुज । आनंदाचें चोज जेवूं संगें ॥२॥
मायलेकरासी नाहीं दुजी परी । जेवूं बरोबरी बैसोनियां ॥३॥
तुका म्हणे ऐसें अंतरींचें आर्त । यावें जी त्वरित नारायणा ॥४॥