संत तुकाराम अभंग - संग्रह १

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग.


मज नाहीं कृपा केली पांडुर...

मज नाहीं कृपा केली पांडुरंगें । संतांचिया संगें पोट भरीं ॥१॥

चतुरांचे सभे पंडित कुशळ । मी काय दुर्बळ विष्णुदास ॥२॥

तुका म्हणे नेणें करुं समाधान । धरिले चरण विठोबाचे ॥३॥