माथां वरद हस्तक । तुझे पायीं हा मस्तक ॥१॥
दोघां पडियेली गांठी । जीवीं जीवा होय मिठी ॥२॥
देहभावसंबंधाचीं । सांपडलों आवडीचीं ॥३॥
येर येरालागीं । मेळ मिळोनियां रंगीं ॥४॥
तुका म्हणे उगवलें । तेजीं तेज समावलें ॥५॥