संत तुकाराम अभंग - संग्रह १

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग.


करोनी पातकें आलों मी शरण ...

करोनी पातकें आलों मी शरण । त्याचा अभिमान असों द्यावा ॥१॥

जैसा तैसा तरी तुझा असें दास । धरियेली कास भावबळें ॥२॥

अवघेच दोष घडले अन्याय । किती म्हणू काय सांगूं आतां ॥३॥

तुका म्हणे आहें पातकी तों खरा । शरण दातारा आलों तुज ॥४॥