काय सेवा करुं आहे सत्ताबळ । तें मज राऊळ कृपा करी ॥१॥
कोण तपोनिधि दानधर्मशील । अंगीं हीनबळ नाहीं सत्ता ॥२॥
काय याती शुद्ध कोण कुळधर्म । तेणें मज वर्म सांपडेल ॥३॥
तुका म्हणे वायां झालों भूमीवर । होईल विचार काय नेणें ॥४॥