संत तुकाराम अभंग - संग्रह १

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग.


इंद्रियांचीं आम्ही पांगिल...

इंद्रियांचीं आम्ही पांगिलों अंकित । त्यांचे रंगीं चित्त रंगलेंसे ॥१॥

एकाचेंही मज न घडे दमन । अवघीं नेमून कैसीं राखूं ॥२॥

तुका म्हणे मज तारीं पंढरिराया । नाहीं तरी वायां गेलों दास ॥३॥