संत तुकाराम अभंग - संग्रह १

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग.


शरण आलों नारायणा । मज अंग...

शरण आलों नारायणा । मज अंगीकारीं दीना ॥१॥

हरि आलों लोटांगणीं । लोळें तुमच्या चरणीं ॥२॥

सांडियेली काया । वरी ओवाळुनी पायां ॥३॥

तुका म्हणे शिर । ठेवियेलें पायांवर ॥४॥