संत तुकाराम अभंग - संग्रह १

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग.


न बोलसी नारायणा । कळलासी ...

न बोलसी नारायणा । कळलासी क्रीयाहीना ॥१॥

आधीं करुं चौघाचारु । मग सांडूं भीडमारु ॥२॥

तुका म्हणे सेवटीं । तुम्हा आम्हा होइल तुटी ॥३॥