संत तुकाराम अभंग - संग्रह १

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग.


भक्तिचिया मापें मोजितों अ...

भक्तिचिया मापें मोजितों अनंता । इतरां तत्वता न मोजवे ॥१॥

योग याग तप देहाचि त्या भागा । ज्ञानाचिया लागा न सांपडे ॥२॥

तुका म्हणे आम्ही भोळ्या भावें सेवा । ध्यावी जी केशवा करितों ती ॥३॥