संत तुकाराम अभंग - संग्रह १

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग.


तुझे रुपीं डोळे । निवती स...

तुझे रुपीं डोळे । निवती सकळ सोहळे ॥१॥

ध्यान साजिरें गोजिरें । कुंडलें तीं मकराकारें ॥२॥

तुझ्या ध्यानाची आवडी । अवलोकितों घडोघडी ॥३॥

तुका म्हणे चित्ता । वाटे न व्हावा परता ॥४॥