संत तुकाराम अभंग - संग्रह १

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग.


आम्ही धरिला चित्तीं । दात...

आम्ही धरिला चित्तीं । दाता रुक्मिणीचा पति ॥१॥

तेणें अवघें झालें काम । निवारिला भवश्रम ॥२॥

परद्रव्य परनारी । झालीं विष्टेचिये परी ॥३॥

तुका म्हणे फार । नाहीं वेगळा वेव्हार ॥४॥