संत तुकाराम अभंग - संग्रह १

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग.


देव देखिला देखिला । कोणा ...

देव देखिला देखिला । कोणा भ्याला नाहीं तो ॥१॥

देव सुंदर सुंदर । नाहीं पार रुपाचा ॥२॥

देव उभा देव उभा । लोपे प्रभा रवीची ॥३॥

देव नीट देव नीट । पायीं वीट धरुनी ॥४॥

देव ध्यानीं देव ध्यानीं । तुका चरणीं लागला ॥५॥