संत तुकाराम अभंग - संग्रह १

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग.


देव विसांवा विसांवा । जीव...

देव विसांवा विसांवा । जीवभावा जाणता ॥१॥

देवा सांगों देवा सांगों । सुख मागों प्रेमाचें ॥२॥

देव खरा देव खरा । सुरासुरां अगम्य ॥३॥

देव दाता देव दाता । आला हाता तुक्याच्या ॥४॥