संत तुकाराम अभंग - संग्रह १

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग.


देव मिळे देव मिळे । भक्त ...

देव मिळे देव मिळे । भक्त भोळे तयांसी ॥१॥

देव भेटे देव भेटे । दुजें आटे त्या ठायीं ॥२॥

देव पाहे देव पाहे । उणें काय डोळ्यांसी ॥३॥

देव गातां देव गांता । हरी व्यथा तुक्याची ॥४॥