संत तुकाराम अभंग - संग्रह १

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग.


देव गडी हा आमुचा । जीव सक...

देव गडी हा आमुचा । जीव सकळां जीवांचा ॥१॥

फेडी अन्तरीचें आर्त । भाव भक्तीचा अंकित ॥२॥

दिसे अन्तर सबाह्य । व्याप्य वेगळाचि राहे ॥३॥

तुका म्हणे अंगसंग । दिला अभ्यंतरीं चांग ॥४॥