संत तुकाराम अभंग - संग्रह १

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग.


देव साह्य देव साह्य । उणे...

देव साह्य देव साह्य । उणें काय तयासी ॥१॥

देव मित्र देव मित्र । सर्व सूत्र त्या हातीं ॥२॥

देव गडी देव गडी । काय गोडी सांगावी ॥३॥

देव पाहे देव पाहे । न्यायान्याय आमुचे ॥४॥

देवसुखा देवसुखा । लाभ देखा अपार ॥५॥

देव शिखा देव शिखा । सूत्र तुका जाण हें ॥६॥