संत तुकाराम अभंग - संग्रह १

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग.


संचित क्रियमाण फळ । काळवे...

संचित क्रियमाण फळ । काळवेळ सारिखी ॥१॥

अवघे संचिताचे भाग । घडे भोग देहासी ॥२॥

सुखदुःख हर्षशीण । करी भिन्न प्रारब्ध ॥३॥

तुका म्हणे अवघड कर्म । मिळे धर्मासारिखे ॥४॥