संत तुकाराम अभंग - संग्रह १

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग.


देव तो रे देव तो रे । ज्य...

देव तो रे देव तो रे । ज्याच्या हातीं सूत्रदोरे ॥१॥

तोचि सगुण निर्गुण । जेथें तेथें परिपूर्ण ॥२॥

तो हा विटेवरी उभा अणूरेणूचा हा गाभा ॥३॥

तुका म्हणे पाहे पाहे । सर्व घटीं भरला आहे ॥४॥