ऐसें तवं भाग्य नाहीं । पूजा कांहीं करावी ॥१॥
पाहोन तीं पदाबुजें । लावूं रज कपाळीं ॥२॥
नाहीं संचित तें गांठी । आर्त पोटी भेटीचें ॥३॥
तुका म्हणे सर्व सिद्धि । वाहे विधि तुळसी ॥४॥