संत तुकाराम अभंग - संग्रह १

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग.


शून्य पडलें कुळासी । जाति...

शून्य पडलें कुळासी । जातिगोत या नामासी ॥१॥

ओस पडला बाजार । अविद्येचा कारभार ॥२॥

अवघा झाला पांडुरंग । जो कां अद्वय अभंग ॥३॥

तुका म्हणे मिळोनियां । गेलों हरीचिया पाया ॥४॥