संत तुकाराम अभंग - संग्रह १

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग.


आतां डोळे तुम्ही पहा दृष्...

आतां डोळे तुम्ही पहा दृष्टीभरी । दिसतों श्रीहरि उभा विटे ॥१॥

श्रीमुख चांगलें सुखाचें निघोट । कुंडलें मुकुट विराजित ॥२॥

कुरुळिया केशें तया तळीं दाटी । व्यंकटा भ्रुकुटी शोभा दिसे ॥३॥

तेथें माझी दृष्टी कैसी राहूं पाहे । कोटि सूर्यां होय ओवाळणी ॥४॥

तुका म्हणे देव कृपेची माउली । वस्ती मज दिली पायांसवें ॥५॥