आवडीच्या कोडें । गाऊं कीर्तनीं पवाडे ॥१॥
गोविंद हरि गोपाळ । गातों आनंद कल्लोळ ॥२॥
तालनृत्यछंदें । टाळी आवडी विनोदें ॥३॥
तुका म्हणे गेला भेद । मग अवघा आनंद ॥४॥
आवडीच्या कोडें । गाऊं कीर्तनीं पवाडे ॥१॥
गोविंद हरि गोपाळ । गातों आनंद कल्लोळ ॥२॥
तालनृत्यछंदें । टाळी आवडी विनोदें ॥३॥
तुका म्हणे गेला भेद । मग अवघा आनंद ॥४॥