कामामाजी काम स्मरे नामावळी । तेणें होय होळी पातकांची ॥१॥
धन्य तोचि प्राणी वैष्णव वरिष्ठ । वाल्मीक तो श्रेष्ठ नामें होय ॥२॥
पापी अजामिळ उग्रसेन बळी । वैष्णव सोहळी नामीं होय ॥३॥
तुका म्हणे नामें मुक्त होय बद्ध । स्मरतां गोविंद एक वेळां ॥४॥