संसारीं असोन स्मरे रामनाम । देव करी काम त्याचे घरीं ॥१॥
आणिक विचार नको धरुं मनीं । नामें चक्रपाणीं वश ॥२॥
केले अजामिळें कधीं नित्य नेम । मुखा आलें नाम एक वेळ ॥३॥
तुका म्हणे तुम्ही मुखीं नाम घोका । उपाय आणिकां पुसों नका ॥४॥