संत तुकाराम अभंग - संग्रह २

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग.


मुख्य मूळ क्षेत्र नाम सर्...

मुख्य मूळ क्षेत्र नाम सर्वां श्रेष्ठ । पंढरी वैकुंठ भूमीवरी ॥१॥

या रे तुम्ही आतां करा हरिकथा । कुढावा अनंता होईल त्या ॥२॥

जाणें अजामिळ व्यास ध्रुवादिक । परीक्षिती शुक थोर थोर ॥३॥

तुका म्हणे तुझें नाम दीनानाथ । भक्तमनोरथ पुरविसी ॥४॥