संत तुकाराम अभंग - संग्रह २

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग.


तरी संत म्हणवावें । नेणे ...

तरी संत म्हणवावें । नेणे आपुलें परावें ॥१॥

भूतमात्रीं हरिवीण । न पाहेचि दुजेपण ॥२॥

प्रेम अंतरीं निस्मीम । मुखीं ज्याचे रामनाम ॥३॥

तुका म्हणे देहभाव । संतीं सोडियेला गांव ॥४॥