संत तुकाराम अभंग - संग्रह २

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग.


धन्य दिवस झाला । आजि सोनि...

धन्य दिवस झाला । आजि सोनियाचा भला ॥१॥

झाली संतांची पंगती । बरवी भोजन आइती ॥२॥

रामकृष्ण नाम । बरवें उच्चारितां प्रेम ॥३॥

तुका म्हणे काला । चवी रसाळ हा आला ॥४॥