संत तुकाराम अभंग - संग्रह २

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग.


आम्ही विठ्ठलाचे दूत । यम ...

आम्ही विठ्ठलाचे दूत । यम आणूं शरणागत ॥१॥

हातो हातीं वाजवूं टाळी । करुं पातकांची होळी ॥२॥

करुं कथा हरिकीर्तन । तोडूं यमाचें बंधन ॥३॥

तुका म्हणे बळी । जन्मा आलों भूमंडळीं ॥४॥