संत तुकाराम अभंग - संग्रह २

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग.


हृदयीं श्रीवत्सलांछन । मि...

हृदयीं श्रीवत्सलांछन । मिरवी भक्तांचें भूषण ।

नाही त्याचा शीण । हृदयीं धरी लातेतें ॥१॥

सत्यभामा दान करी । उजूर नाहीं अंगीकारी ।

सेवकाच्या शिरीं । धरुनी चाले पादुका ॥२॥

राखी दारवंठा बळीचा । सारथी झाला अर्जुनाचा ।

सेवक दासांचा । होय साचा अंकित ॥३॥

भिडा न बोलवे पुंडलिकासी । पाठी उभा मर्यादेसी ।

तुका म्हणे ऐसी । कां हो न भजा माउली ॥४॥