संत तुकाराम अभंग - संग्रह २

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग.


लुटा संतजन । अमूप हें राश...

लुटा संतजन । अमूप हें राशी धन ॥१॥

तारुं लागलें बंदरीं । चंद्रभागेचिये तीरीं ॥२॥

नलगे कांहीं बळ । धांव घाला रे सकळ ॥३॥

तुका जवळी हमाल । भार सादवी विठ्ठल ॥४॥