ब्रह्मज्ञान नव्हे लेंकुराच्या गोष्टी । तेथें व्हावा पोटीं अनुताप ॥१॥
दगडाहुनि जीव करावा कठीण । अंतरींचा शीण तेव्हां जाय ॥२॥
मेल्या मनुष्याची न धरिती आस । तैसा हो उदास संसारासी ॥३॥
तुका म्हणे येथें कराराचें काम । मग आहे राम जवळीच ॥४॥