सद्गुरुवांचूनी सांपडेना सोय । धरावे ते पाय आधीं त्याचे ॥१॥
आपणासारिखे करिती तात्काळ । नाहीं काळ वेळ मग त्यासी ॥२॥
लोह परिसाची न साहे उपमा । सद्गुरुमहिमा अगाधचि ॥३॥
तुका म्हणे कैसे आंधळे हे जन । गेले विसरुन खर्या देवा ॥४॥