जेणें निर्मियेली काया । कां रे नाठविसी तया ॥१॥
अंतीं यमाची जाचणी । सोडवाया नाहीं कोणी ॥२॥
गृहधन सुतदारा । कां रे भुललासी गव्हारा ॥३॥
तुका म्हणे पाहीं । धरा विठ्ठल हृदयीं ॥४॥