नरनारीदेह लाभे एकवेळ । झालिया गोपाळ आठवावा ॥१॥
बहुजन्माअंतीं सांपडला हिरा । न मिळे माघारा परतोनी ॥२॥
इच्छिताती देव स्वर्गींचे सकळ । मिळो एक वेळ नरदेह ॥३॥
तुका म्हणे देहीं करा आत्महित । वेदांत मथित सांगितलें ॥४॥