संत तुकाराम अभंग - संग्रह २

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग.


सळें धरुनि बैसला काळ । चु...

सळें धरुनि बैसला काळ । चुकों नेदी घटका पळ ॥१॥

कां रे अद्यापि न कळे । केंस पिकले कान डोळे ॥२॥

तुज ठावें मी जाणार । पाया शोधुन बांधीं घर ॥३॥

हात सांडुनि असता होती । तोडीं पाडुन घेसी माती ॥४॥

तुका म्हणे वेगें । पांडुरंगा शरण रिघें ॥५॥