संत तुकाराम अभंग - संग्रह २

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग.


कां रे व्यर्थ गर्वें जाता...

कां रे व्यर्थ गर्वें जातां । हरिचरण वंदा माथां ॥१॥

सृष्टिकर्ता ब्रह्मदेव । तोहि चरणीं मागे ठाव ॥२॥

शिव घाली लोटांगण । इतरांचा पाड कोण ॥३॥

शुक सनकादिक योगी । तेहि पायीं जडले वेगीं ॥४॥

रमेसारिखी सुंदरी । झाली पायांची किंकरी ॥५॥

तुका म्हणे याचे पायीं । जडलों तोंचि तरलों पाहीं ॥६॥