संत तुकाराम अभंग - संग्रह २

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग.


शरीरा काळाचें वित्त कुबेर...

शरीरा काळाचें वित्त कुबेराचें । तेथें मानवाचें काय आहे ॥१॥

निमित्याचा धणी केला असे प्राणी । ज्याची तो करणी करुनि जाय ॥२॥

देता देवविता घेता घेवविता । कर्ता करवितां पांडुरंग ॥३॥

तुका म्हणे कां रे नाशवंतासाठीं । देवासवें तुटी पाडितोसी ॥४॥