तिवासिया लोड टाकुनि बैससी । दंड करितोसी अनाथांतें ॥१॥
आनाथांसी दुःख देसी सर्व काळ । ऐसी तुज वेळ पुढें आहे ॥२॥
आहे नाहीं काय न करिसी विचार । काय तूं पामर जन्मलासी ॥३॥
तुका म्हणे धरीं एक भूतदया । अहंता ते वायां न धरीं मनीं ॥४॥