संत तुकाराम अभंग - संग्रह २

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग.


दुर्जनाचा संग आगीचें तें ...

दुर्जनाचा संग आगीचें तें झाड । अंगा येती फोड लागतांचि ॥१॥

काय लाभ असे तेथें बैसायाचा । विटंब देहाचा कां करावा ॥२॥

गूळ सांडोनियां इंद्रावण खावें । ऐसे कां करावें तुका म्हणे ॥३॥