संत तुकाराम अभंग - संग्रह २

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग.


पंचभूतें जाती लया । अंतीं...

पंचभूतें जाती लया । अंतीं आपुलाले ठाया ॥१॥

अस्थि मांस पृथ्वी नेत । आप उदकीं मिळत ॥२॥

तेज अग्निरुप झालें । प्राण वायूसी मिळाले ॥३॥

शब्द आकाशीं निमाला । त्रिगुणाचा क्षय झाला ॥४॥

तुका म्हणे मृगजळ । भास लटिका सकळ ॥५॥