संत तुकाराम अभंग - संग्रह २

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग.


काय सूकरासी घालुनी मिष्टा...

काय सूकरासी घालुनी मिष्टान्न । खरासी लेपन चंदनाचें ॥१॥

काय शेजे बाजे मर्कटा विलास । अलंकार नास करुनी टाकी ॥२॥

तुका म्हणे काय पाजुनी नवनीत । सर्पा विष थित अमृतहि ॥३॥