संत तुकाराम अभंग - संग्रह २

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग.


आलें तेव्हां तेंचि राहिले...

आलें तेव्हां तेंचि राहिलें पिकोन । जरी तें जतन होय देठीं ॥१॥

नामेंचि सिद्धि नामेंचि सिद्धि । व्यभिचार बुद्धि न पावतां ॥२॥

चालिला पंथ तो पावला त्या ठाया । जरी आड तया कांहीं नये ॥३॥

तुका म्हणे मध्यें पडती आघात । तेणें होय घात हानि लाभ ॥४॥