संत तुकाराम अभंग - संग्रह २

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग.


ज्याचा सखा हरि । त्यावरि ...

ज्याचा सखा हरि । त्यावरि विश्व कृपा करी ॥१॥

ऐसा असोनी अनुभव । कासावीस होतो जीव ॥२॥

ज्यास हरीचे चिंतन । त्यासि बांधू न शके विघ्न ॥३॥

तुका म्हणे हरि । प्रल्हादासी यत्‍न करी ॥४॥